Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठवाड्यात आज दोन सभा होणार आहेत. नांदेड आणि परभणी येथे सभा होणार आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे उमेदवारी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यासोबत पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
"देशात पहिल्या टप्याचे मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या आणि पहिल्या वेळी मतदान करणाऱ्यांचे आभार मानतो. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झालं आहे. मात्र कोणालाही मतदान करा पण मतदान जरूर करा. सध्या उष्णता खूप आहे, लग्नसमारंभ आहेत, शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. पण देशाच्या सीमेवर कोणत्याही परिस्थितीत जवान उभा असतो. मतदारांमध्येही ही जागृती असली पाहिजे. आपल्या देशाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मतदान करा.
"ज्यांचा पराभव पक्का आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो मतदान करण्यासाठी सर्वांना प्रेरित करा. जगात सर्वाधिक मतदान भारतात होतं. तसेच अधिक मतदान लोकशाहीचा परिचय देते. पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडिया आघाडाली नाकारले आहे. तुमच्याकडे कोणाचा चेहरा आहे. देश कोणाला सोपवायचा आहे हे तर सांगा," असा सवालही पंतप्रधानांनी इंडिया आघाडीला केला. यासोबत 'काँग्रेसचे नेता आपला पराभव मान्य केलाय. त्यांच्यात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यांना उमेदवार मिळणे कठीण झाले आहे.
"काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेचा इलाज करणे ही मोदींची गॅरंटी आहे. आमचा खूप वेळ काँग्रेसने केलेले खड्डे भरण्यात गेलाय. येणाऱ्या पाच वर्षात मराठवाडा आणि महाराष्ट्राला समोर न्यायचे आहे. त्यामुळे नांदेड लोकसभेतील प्रताप पाटील आणि हिंगोलीत बाबुराव कोहळीकर यांना रेकॉर्ड मतांनी विजयी करा. मतदांचे संपूर्ण रेकॉर्ड तुटले पाहिजे. प्रत्येक घरात जाऊन मोदींचा प्रणाम पोहोचवा," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.विरार-अलिबाग आता दीड तासांचा प्रवास! महाराष्ट्रात तयार होणा...
India Alliance Prime Minister PM Modi CM Eknath Shinde BJP Nanded Hingoli Marathi News Maharashtra News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Read more »
'वसंत मोरेंची वृत्ती भावली, पण सपोर्ट धंगेकरांनाच...', किरण मानेंची पोस्ट, म्हणतात 'वरिष्ठांची निंदानालस्ती...'वसंत मोरे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Read more »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Read more »
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Read more »
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
Read more »
'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्टPM Modi Post on Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे.
Read more »