KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.
टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू केएल राहुल सध्या खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलला कमाल दाखवता आली नसल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तर अनेकदा त्याच्यावर ट्रोलिंग देखील झालं. वनडे वर्ल्ड कपनंतर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला अन् नंतर त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता केएल राहुल पुन्हा टीम इंडियामध्ये पुनरागमनाची संधी शोधत आहे. अशातच आता केएल राहुलने अनुष्का शर्माचा एक किस्सा शेअर केलाय.
माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. मेलबर्न टेस्ट सुरू असताना आम्ही एकदा हॉटेलमध्ये होतो. तेव्हा मी माझ्या फलंदाजीच्या फॉर्ममुळे चिंतेत होतो. मला दु:ख होत होतं आणि मी हताश देखील झालो होतो. अनुष्काला माझी काळजी होती, तिला माझ्या देहबोलीमधून सर्वकाही समजत होतं. त्यावेळी विराट आणि अनुष्का माझे खूप चांगले मित्र होते. दोघंही माझ्याशी चांगले वागायचे. मैत्रीच्या काळजीपोटी अनुष्काला देखील वाईट वाटलं असावं, असं राहुल म्हणतो.एकदा अनुष्का माझ्या रुममध्ये आली. त्यावेळी मी रुममध्ये एकटाच बसलो होतो.
दरम्यान, दोघांनी मला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्यांच्या वाईट काळात संकटावर कशी मात केली, याचे किस्से सांगितले. त्यानंतर मला खूप बरं वाटलं. माझ्यामधली नकारात्मता कमी झाली, असं राहुल सांगतो. अनेकदा त्यांनी मला बाहेर जेवायला नेलं. त्यावेळी दोघांनी मला खूप मदत केली. मला वाईट काळात देखील सकारात्मक राहण्याचं गमक त्यांनी सांगितलं, असा किस्सा राहुलने यावेळी सांगितला.
Anushka Sharma Bad Time Virat Kohli Anushka Virat Cricket KL Rahul On Anushka Sharma Austrelia Tour Latest Cricket News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकीVanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती.
Read more »
पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.
Read more »
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्साSambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.
Read more »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »
गणेशोत्सवाआधीच भाज्या महागल्या, 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढीमुळं सणावाराचं बजेट कोलमडणारगणेशोत्सवाची धूम सगळीकडे असताना बजेट कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
Read more »