Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं व भीषण गरमीमुळं नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी घरातून निघाल्यानंतर काही वेळ चालल्यानंतरही उकाड्याने व घामाने नागरिकांची होरपळ होत आहे. उन्हाळा वाढत चालल्याने मुंबईकरांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. सामान्य लोकलमे प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही आता एसी लोकलची वाट पकडली आहे. त्यामुळंच एसी लोकलच्या तिकिट विक्रीत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एसी लोकलच्या तिकिटांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाला आहे. 6 मे रोजी एका दिवसात 32,016 तिकिटांची विक्री झाली आहे. एका दिवसांत विक्री झालेल्या या तिकिटांची संख्या विक्रमी आहेत. 6 मे रोजी एसी लोकलसाठी 3737 प्रवाशांनी सिझन तिकिट खरेदी केले आहेत. तर, 28,279 प्रवाशांनी रेग्युलर तिकिट घेऊन एसी लोकलमधून प्रवास केला आहे. मध्य रेल्वेवर 18,932 एसी लोकलसाठी तिकिटांची विक्री झाली आहे.
पश्चिम रेल्वेवर 8 डब्यांच्या एसी लोकलच्या 96 फेऱ्या चालवल्या जातात. तर, मध्य रेल्वेवर 6 डब्यांच्या 66 फेऱ्या चालवल्या जातात. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उकाड्यात वाढ होत असताना एसी लोकलमुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या वाढवण्यात येत आहे. आरामदायक प्रवासासाठी 3 मे रोजी सर्वाधिक तिकिटविक्री झाली होती. 30,810 इतकी एसी लोकलची तिकिट विक्री झाली होती. तर, तीन दिवसांताच यापेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. हा आकडा 32 हजारांच्यावर गेला आहे.
Mumbai News Mumbai News In Marathi Western Railway Mumbai Ac Local Train Update Mumbai Local Train Update Mumbai Local Train News In Marathi मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल ट्रेन
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Rohit Sharma: एकाच डावात दोन वेळा आऊट झाला रोहित शर्मा? पाहा नेमकं काय घडलं?Rohit Sharma : मुंबईच्या डावात पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हर्षल पटेलने स्लो यॉर्कर टाकत रोहित शर्माला आऊट केलं. यावेळी क्रीजपासून दूर फेकलेला बॉल रोहितच्या पुढच्या पायाला लागला.
Read more »
Nagpur News : प्रेयसी बोलत नाही म्हणून, प्रियकराने दुकानच पेटवून दिलं अन्...Nagpur News : नागपुरातील या घटनेमुळं एकच खळबळ. घटनाक्रम समोर आला आणि तपास यंत्रणाही हादरल्या. नेमकं काय घडलं, त्या दोघांमध्ये नेमकं काय घडलं...?
Read more »
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Read more »
IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Read more »
Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
Read more »
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
Read more »