बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
बदलापूर आंदोलन ाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी... Badlapur Protests :
बदलापूर आंदोलनाबाबत मोठी अपडेट सोमर आली आहे. आंदोलक आंदोलन मागे घेत नसल्याने पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जमावाला मागे हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलांनी दगडफेक केली आहे. पोलिस आणि आंदोलक यांच्यात धमश्चक्री सुरु असल्याचे चित्र बदलापूर रेल्वे स्थानकात पहायला मिळत आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. अनेक आंदोलक यात जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
दलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय. सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन ताब्यात घेतले असून पोलिस आंदोलकांना पांगवण्याचे प्रयत्न करत आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरु असताना संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय. दरम्यान याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आलंय.. तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आलाय.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली करण्यात आलीये.
Badlapur School Crime बदलापूर लहान मुल अत्याचार प्रकरण बदलापुर नागरिक पालक आंदोलन ठिय्या बंद. मराठी बातम्या Parents Citizens Agitation At Badlapur School Girl Sexual Harassment Case Marathi News Latest News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Read more »
नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Read more »
अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड का होते? कारण आलं समोरआशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात (Anant Ambani Marriage) क्यूआर कोड प्रवेश, कलर-कोडेड रिस्टबँड, हाय-प्रोफाइल पाहुणे आणि व्यापक वैद्यकीय तयारी होती,
Read more »
...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासाNavi Mumbai Crime: यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याने तपासात पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे.
Read more »
... तर अगरवाल दाम्पत्य परदेशात फरार होईल; पोलिसांनी कोर्टाला सांगितली महत्त्वाची माहितीPorsche Crash Case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे. अगरवाल दाम्पत्याला जामीन देऊ नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.
Read more »