पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

Pune News

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल
Pune AccidentPune Porsche Car Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.

पुण्यात पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही समोर आलं आहे.पुण्यात रविवारी भीषण अपघात झाला असून पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगात असणाऱ्या कारने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवर असणारे दोघेही हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चोप दिला. या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार कार अत्यंत वेगात होती. दरम्यान पीडित तरुण, तरुणी स्कुटीवर होते आणि अपघाताच्या काही सेकंद आधी त्यांनी यु-टर्न घेतला होता. यानंतर पाठून वेगाने ही कार जाताना दिसत आहे. सीसीटीव्हीत नेमका अपघात कैद झालेला नाही. पण कार गेल्यानंतर लगेचच लोक तिच्या दिशेने धावत असल्याचंही सीसीटीव्हीत दिसत आहे.अल्पवयीन चालक पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अनेक गाड्यांना धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटी शर्थीदेखील ठेवल्या आहेत. कोर्टाने आरोपीला या दुर्घटनेवर निबंध लिहिण्यास सांगितला आहे. तसंच, 15 दिवस येरवडा ट्रॅफिक पोलिसांत स्वेच्छेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर दारू सोडण्यासाठी मदत करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेण्यास सांगितले आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Accident Pune Porsche Car Accident

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.
Read more »

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
Read more »

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
Read more »

लिफ्टमध्ये कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला, अंगावर काटा आणणारा Videoलिफ्टमध्ये कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला, अंगावर काटा आणणारा VideoDog Attack : कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीएत. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सोसायटीच्या एका लिफ्टमध्ये लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला केला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Read more »

दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
Read more »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Read more »



Render Time: 2025-02-25 05:05:42