Laser Effects on Eyes: लेझर लाइटमुळं दोन तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
: बाप्पाचे आगमन झाले आहे. शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पा विराजमान झाले. अलीकडे सार्वजनिक गणेश आगमन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकांमध्ये लेझर लाइटचा वापर केला जातो. मात्र या लेझर लाइटचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातही असाच एक प्रकार घडला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. तर, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस हवलदाराच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे.
तरुण गणपती आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्याचवेळी लेझर किरणांच्या लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. हा तरुण उचगाव मधील रहिवाशी आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेझर किरणांमुळे इजा झाली. संबंधित कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युवराज पाटील असं या हवालदार पोलिसाचे नाव आहे. एकीकडे कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश विसर्जन असो किंवा मिरवणूक यामध्ये लेझर शो वापरावर बंदी घातली आहे अशी भूमिका घेतली, पण सर्रास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र गणेश आगमन मिरवणुकीमध्ये थेट लेझर शो मोठ्या प्रमाणात वापरल्याच दिसून आलं आहे.दरम्यान, या आधीही असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या लेझर लाइटकडे एकटक पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो.
लेझर लाइट व डीजेचा आवाज या दोन्ही गोष्टींमुळं इजा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. डिजेच्या आवाजामुळं हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता लेझर लाइटमुळं दोघा जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Laser Effects On Eyes Laser Eye Damage Laser Exposure Eye Injury Vision Loss Blindness Cataracts Glaucoma Retinal Damage Macular Degeneration Eye Burns Photoretinitis Solar Retinopathy Laser Safety Eye Protection Laser Safety Glasses Laser Eye Protection लेझर लाइटमुळं दृष्टी गमावली लेझर लाइट दुष्परिणाम कोल्हापूर बातम्या कोल्हापूर आजच्या बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटकKolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Read more »
पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »
बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्तीBadlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Read more »
रत्नागिरीत खळबळ! 19 वर्षांच्या नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कारRatnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
Read more »
बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
Read more »
कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपीKalwa Hospital Molestation Case: ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Read more »