लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः महायुतीमध्ये. इच्छुकांची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत.
आधी मुंबईतला सागर बंगला... आणि आता नागपुरातला देवगिरी बंगला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची रीघ लागलीय. कुणाला लोकसभेचे तिकीट हवंय, तर कुणी तिकीट मिळालं नाही म्हणून रुसलंय. कुणी महायुतीच्या उमेदवारालाच विरोध केलाय, तर कुणी अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय... या सगळ्यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत. गेल्या चार दिवसांत फडणवीसांच्या घरी कुणी आणि का भेट घेतली जाणून घेवूया.
12 एप्रिलला माढाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि माणचे आमदार जयकुमार गोरे खास विमानानं नागपूरला पोहोचले. माढामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर महायुतीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. 13 एप्रिलला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय.
14 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत नागपूरला पोहोचले. त्यांची फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली, ते समजू शकलं नाही. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा धडाका सुरू केलाय... त्याबाबत सामंतांनी तक्रार केल्याचं समजतंय.माढा मतदारसंघ सध्या भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरतोय. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतल्यानं माढाचा तिढा आणखीच वाढलाय.
त्याशिवाय काँग्रेस नेते आबा बागुल यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती समजतेय. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. आबा बागुलांसोबत त्यांची दोन मुलं अमित आणि हेमंत बागुलही उपस्थित होते. आबा बागुल हे पुण्यातून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत... मात्र, भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा दावा बागुल कुटुंबीयांनी केलाय... एका लग्न समारंभात भेट झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलीय.
लोकसभेला महाराष्ट्रातून खासदारांची संख्या 45 पार नेण्याचा विडा महायुतीच्या नेत्यांनी उचललाय. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रिक साधण्यासाठी हा आकडा भाजपला गाठावाच लागेल... त्यासाठीच देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. त्यांच्या शिष्टाईला किती सफल होते, यावर भाजपचं यशापयश अवलंबून असणार आहे.महाराष्ट्र
Lok Sabha Elections Maharashtra Politics Big Responsibility Damage Control देवेंद्र फडणवीस
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Read more »
आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडतीLoksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Read more »
...जब चुनाव प्रचार के दौरान रो पड़े भाजपा प्रत्याशी देवेंद्र झाझड़िया, वीडियो वायरलLok Sabha Elections 2024 : राजस्थान की चूरू लोकसभा सीट से भाजपा प्रत्याशी देवेंद्र झाझड़िया चुनाव प्रचार में जुटे हुए है। लेकिन, चुनाव प्रचार के दौरान एक अजीब वाकया सामने आया, जो क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ है।
Read more »
Bihar Politics: अशफाक, हिना के बाद सरफराज, देवेंद्र और राजबल्लभ यादव बने खतरा...बिहार में दरका लालू का 'M-Y'Bihar Loksabha Chunav News: बिहार में आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव की ताकत उनके मुस्लिम-यादव (M-Y) समीकरण को माना जाता रहा है। पहली बार ऐसा हो रहा है कि मुस्लिम और यादव लालू से नाराजी का अपने-अपने अंदाज में इजहार करने लगे हैं। अशफाक करीम, हिना शहाब के बाद अब सरफराज गुस्से में हैं तो देवेंद्र प्रसाद यादव, राजबल्लभ यादव, पप्पू यादव भी लालू के...
Read more »
फायरिंग के बाद सलमान खान से CM शिंदे ने की बात, फडणवीस बोले- अटकलबाजी की जरूरत नहींहिंदी सिनेमा के एक्टर सलमान खान के बांद्रा निवास के बाहर फायरिंग की घटना सामने आने के बाद महाराष्ट्र के नेताओं ने राज्य सरकार की कानून व्यवस्था पर सवाल उठाए हैं. संजय राउत ने कहा कि कि राज्य में कानून-व्यवस्था खतरे में है. गृह मंत्री कहां हैं?
Read more »
महाराष्ट्र: अमृता फडणवीस ने बोला राज्य सरकार पर हमला, कहा- हावी हो रही है 'खाऊंगा, खाने भी दूंगा' की संस्कृतिमहाराष्ट्र: अमृता फडणवीस ने बोला राज्य सरकार पर हमला, कहा- हावी हो रही है 'खाऊंगा, खाने भी दूंगा' की संस्कृति amrutafadnavis
Read more »