Maharashtra Weather Alert: ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जाणून घेऊया.
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ऑगस्टनंतर पाऊस पुनरागमन करेल असा इशारा देण्यात आला होता. आता मात्र हा इशारा खरा ठरला आहे. पावसाने ऑगस्ट अखेर चांगला जोर पकडला आहे. मराठवाडावगळता राज्याच्या इतर भागात दमदार पाऊस सुरू आहे.
राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. बहुतांश भागात जोरदार पावसाने शनिवारी हजेरी लावली होती. पुणे, सातारा घाटमाथ्याला रविवारी रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाडा वगळता गुरुवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत असून त्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळं राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
हवामान विभागाने आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, साताऱ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.आज 25 ऑगस्ट रोजी पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो.
Maharashtra Rain Alert Maharashtra Rain News Maharashtra Rain Update Weather Today At My Location Weather News Mumbai Rain Alert Mumbai Rain News पाऊस अलर्ट हवामान आजचे हवामान
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राज्यात 4 दिवस पावसाचा जोर ओसरणार, 'या' जिल्ह्यांना मात्र अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवड्यात धुमाकुळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.
Read more »
काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
Read more »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
Read more »
राज्यात पावसाची दडी; उन्हाचा तडाखा वाढला, 'या' तारखेपर्यंत उकाडा राहणारMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे.
Read more »
मुंबईसह राज्यात पावसाची उसंत, पण 'या' तारखेपासून पुन्हा जोर धरणार, घाटमाथ्यावर...Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. तर ऑगस्टपासून पाऊस पुन्हा जोर धरणार आहे.
Read more »
पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या
Read more »